ताज्या बातम्यामुंबईराजकीय

NCP Meeting in Mumbai | शरद पवारांनी बोलावली पक्षातील प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक, मुंबईत घडामोडींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Meeting in Mumbai | राज्यात राजकीय घडामोडींना वेग येत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजप (BJP) अधिक आक्रमक झाला आहे. आरोप – प्रत्यारोप करण्यात येत आहेत. राज्य सरकारला (Maharashtra Government) विरोधक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली (NCP Meeting in Mumbai) आहे. आज सायंकाळी पाच वाजता मुंबईत ही बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात (Yashwantrao Chavan Hall) ही बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार, अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित राहणार आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत (NCP Meeting in Mumbai) अनेक मुद्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) करण्यात येत असलेले आरोप, नवाब मलिकांना (Nawab Malik) झालेली अटक (Arrest) आणि त्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्यासाठी (Resignation) होत असलेली मागणी, या सर्व प्रमुख मुद्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

यासोबत नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) भाजपने चार राज्यात एकहाती सत्ता मिळवली आहे.
या विजयामुळे महाराष्ट्रातील भाजप (Maharashtra BJP) नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
भाजपकडून राज्य सरकारमधील नेत्यांवर होणारे आरोप, गुन्हे दाखल, ईडी (ED), आयकर विभागाचे (Income Tax Department) छापे यावरून राज्याचं वातावरण ढवळून निघाले आहे.
या मुद्यावर आज होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजतेय.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सव्वाशे तासांच्या स्टिंग ऑपरेशनचा (Sting Operation) पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen Drive Bomb) फोडला आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शरद पवार यांचे देखील नाव आल्याने या मुद्यावर ही चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसेच आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या (Maharashtra Municipal Elections) संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title :- NCP Meeting in Mumbai | ncp chief sharad pawar called important meeting of party leaders today in mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button