NCP Meeting | राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांच्या बैठकीत शिवसेना-काँग्रेस मंत्र्यांबद्दल नाराजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन NCP Meeting |महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थिर असून ते पाच वर्षाचा कलावधी पूर्ण करेल असा दावा आघाडीमधील मित्र पक्षांकडून वारंवार केला जात आहे. परंतु तिन्ही पक्षातील समन्वयाचा अभाव अनेकदा दिसून आला आहे. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP Meeting) आपल्याला विचारात घेत नसल्याची तक्रार यापूर्वी काँग्रेसने (Congress) केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीने शिवसेना आणि काँग्रेसबद्दल नाराजी बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक (NCP Meeting) आज (बुधवार) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (Yashwantrao Chavan Pratishthan) येथे पार पडली. त्यावेळी अनेक नेत्यांनी शिवसेना, काँग्रेसच्या पालकमंत्र्यांबद्दल नाराजी (displeasure)व्यक्त केली.

शिवसेना आणि काँग्रेसचे पालकमंत्री राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामे करत नाहीत, अशी तक्रार अनेक नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर (Guardian Minister) विशेष नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपली नाराजी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर बोलून दाखवली. तीन पक्षाचे सरकार असल्याने सहकार्य अपेक्षित आहे. परंतु शिवसेना आणि काँग्रेसचे पालकमंत्री राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामे मार्गी लावत नाहीत, अशा शब्दांत नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

इतर पक्षांना सहकार्य करणं अपेक्षित- मलिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि पालकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, प्रत्येक पक्ष आपल्या आमदाराला झुकतं माप देत असतो. मात्र, सत्तेत असलेल्या इतर पक्षांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. प्रत्येक प्रश्न सुटेलच असं नाही. मात्र, प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत, असे मलिक यांनी सांगितलं.

 

Web Title : NCP Meeting | ncp mlas express displeasure about guardian ministers shiv sena and congress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rain in Maharashtra | आगामी 24 तासांत कोकणात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह पुण्याला इशारा

Mumbai MNS | ‘मनसे’ची मुंबईमध्ये पोस्टरबाजी ! खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?

Rupali Chakankar | BJP खासदाराच्या सुनेला मारहाण; सुनेच्या मदतीसाठी धावल्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर