राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ‘कोरोना’चा संसर्ग !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.जयंत पाटील यांनी  ट्विट करत आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या  ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे. लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करुन अशी विनंती करतो, असे त्यांनी म्हटले आहे. आपण जितके काम व्हर्च्युअली करणे शक्य होईल, सध्या तितके करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.