NCP MLA Amol Mitkari | ‘त्या’ व्हिडिओमुळे अमोल मिटकरी अडचणीत, कारवाई होणार?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी तीन दिवसांपूर्वी एक व्हि़डिओ ट्विट केला होता. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शौचालयामधील पाण्याने कप धुताना दिसत होता. हा व्हिडिओ आमदार निवासमधील (MLA Residence) असल्याचा दावा अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department (PWD) याबाबतचा अहवाल सादर केला आहे.

 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची चौकशी केली असता, हा व्हिडीओ आमदार निवासमधील नसल्याचे समोर आले आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी जो व्हिडिओ ट्विट केला आहे, त्या व्हिडिओमध्ये ज्या स्टाइल्स दिसत आहेत त्या क्रिम रंगाच्या आहेत. परंतु आमदार निवासमधील सर्व शौचालयांमध्ये लावलेल्या स्टाईल्स या ग्रे रंगाच्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिडो आमदार निवासमधील असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सादर करण्यात आला आहे.

मिटकरींवर कारवाईची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभागाने मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी ट्विट केलेला व्हिडिओ आमदार निवासमधील शौचालयातील नसल्याचा अहवाल सादर केला. यानंतर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मिटकरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारची बदनामी करण्यसाठी खोट्या बातम्या पसरवायच्या हे योग्य नाही, त्यामुळे अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं महाजन यांनी म्हटलं आहे. छोट्याशा प्रसिद्धीसाठी आपण काय करतो हे त्यांना कळायला हवं, असा टोलाही महाजन यांनी लगावला.

 

स्वत: वस्तुस्थिती दाखवणार
सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार निवास मधील शेअर केलेल्या टॉयलेट मधील
किळसवाणा प्रकाराचा व्हिडिओ तिथला नसल्याचे पत्रकारांना खोटे सांगितले असले
तरी वस्तुस्थिती उद्या पत्रकार बांधवांना स्वतः दाखवुन देईल. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल
अशी अपेक्षा असल्याचे अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

 

Web Title :- NCP MLA Amol Mitkari | amol mitkaris problems are likely to increase due to a video posted on twitter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला

MP Rahul Shewale | ‘खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न, माझी NIA कडून चौकशी करा’ – खासदार राहुल शेवाळे (व्हिडिओ)