मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात (Padwa Melava) राज ठाकरे यांनी हिंदू बांधवांना रामनवमी जोरात साजरी करण्याचे आवाहन केले होते. आज देशभरात रामनवमी (Ram Navami) उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) स्वत: परदेश दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. यावेळी अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंचा उल्लेख तथाकथित ‘हिंदू जननायक’ असा केला आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन राज ठाकरे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत निशाणा साधला आहे. मिटकरी ट्विटमध्ये म्हणाले, रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वत: मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित ‘हिंदू जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता रामनवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात, हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा.
रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित "हिंदु जननायक" परदेश दौऱ्यावर पळाले.
त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे…
याला म्हणतात , "हंस चुगेगा दाना तिनका l
कौआ मोती खायेगा ll"— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 30, 2023
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना हिंदू बांधवांनी रामनवमी जोरात साजरी करावी,
असे आवाहन केले होते. तसेच एकदा राज्य माझ्या हातात द्या, मी सगळा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन.
कुणीही यावे आणि टपली मारुन जावे, हे चालणार नाही. माझ्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे,
यंदा रामनवमी जोरात साजरी करा. 6 जूनला शिवछत्रपतींच्या राज्यभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत.
मी रायगडावर जाणार आहे. तुम्ही सर्वांनी दक्ष रहा, सावध रहा असे राज ठाकरे म्हणाले होते.
यावरुन अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
आता यावर मनसे कशा प्रकारे उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरले.
Web Title :- NCP MLA Amol Mitkari | ncp mla amol mitkari criticise mns chief raj thackeray over ramnavami celebration tweet
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update