NCP MLA Amol Mitkari | राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अमोल मिटकरी निधीसाठी कमीशन घेतात, थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) हे सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) हे रविवारी (दि.28) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी मूर्तिजापूरमध्ये त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांनी (Zilla Parishad) आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) निधीसाठी कमिशन (Commission) घेतात, असा गंभीर आरोप केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

 

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे (Controversial Statement) चर्चेत असणारे अमोल मिटकरी सध्या कमिशन घेतल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. अकोला जिल्ह्यात त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी कमिशन घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. जयंत पाटील यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांनी मिटकरींच्या तक्रारींचा पाढा वाचला. त्यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Video Viral) होत आहे. पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेत जयंत पाटील यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

 

नेमका काय आहे आरोप?

अमोल मिटकरी यांनी आतापर्यंत जिल्ह्यात 50 कोटींचा निधी आणला,
परंतु पक्षाच्या सदस्यांना विकास कामांसाठी निधी (Development Fund) दिला नसल्याचा आरोप होत आहे.
तसेच, जिल्हाध्यक्षांना निधी देताना आमदारांनी कमिशन मागितल्याचा आरोप
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Nationalist Youth Congress) जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड (Shiva Mohod)
यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर केला.
तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनीही विकास कामासाठी निधी दिला
जात नसल्याची तक्रार जयंत पाटील यांच्याकडे आढावा बैठकीत केली.

 

Web Title :- NCP MLA Amol Mitkari | ncp mla amol mitkari takes commission for funds ncp officials complain to jayant patal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा