राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी सांगितला गोळीबाराचा ‘थरार’; पिंपरी-चिंचवडमधील सर्व मित्रांना केली विनंती, म्हणाले – ‘मी सुखरूप आहे, तुम्ही शांततेत राहा’ (व्हिडीओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर आमदार बनसोडे यांनी नेमका काय प्रकार झाला हे प्रसारमाध्यमांना सांगितले. आमदार बनसोडे यांनी एका कॉन्ट्रक्टर आणि त्याच्य सुपरवायझरबाबत सविस्तर माहिती दिली आणि घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा थरार सांगितला.

एका कॉन्ट्रक्टरकडे सुपरवायझर म्हणून काम करणारा तानाजी पवार आज कार्यालयात आला होता. त्याने वाद घातला आणि त्यानंतर फायरिंग केले. एक गोळी माझ्यादिशेने देखील आली होती असं अण्णा बनसोडे यांनी सांगितलं. त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांनी खाली पाडलं असं त्यांनी सांगितलं. अण्णा बनसोडे यांनी सर्व मित्रांना विनंती म्हणून सांगितले आहे की, मी सुखरूप आहे, तुम्ही शांत राहा.