NCP MLA Ashok Pawar | राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना जीवे मारण्याची धमकी (व्हिडिओ)

पुणे / शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune district) शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार (NCP MLA Ashok Pawar) यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी (threatened kill) दिली आहे. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur police station) सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढून धमकी देणाऱ्यास तात्काळ शोघ घेऊन आमदार अशोक पवार (NCP MLA Ashok Pawar) यांना पोलीस संरक्षण (Police protection) देण्याची मागणी केली आहे.

 

यासंदर्भात शिरूर तालुका राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष रवींद्र काळे (Ravindra Kale) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तक्रारी निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.17) रोजी शहरातील काही लोकांना निनावी पत्र आले असून त्यामध्ये शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांची व त्यांच्या पत्नी पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) सदस्या सुजाता अशोक पवार (Sujata Ashok Pawar) यांची निनावी पत्राद्वारे बदनामी करुन अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

 

या पत्रामध्ये काही नगरसेवक आणि इतर काही लोकांची बदनामी केली आहे. त्यामुळे शिरुर शहरात दहशतीचे वातावरण झाले असून त्या निनावी पत्र लिहिणाऱ्या लोकांचा योग्य प्रकारे तपास करुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर करावाई करण्याची मागणी तालुकाध्यक्ष रविंद्र काळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) व पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत (Police Inspector Suresh Kumar Raut) यांच्याकडे केली आहे.

 

यावेळी नगरपरिषद ते पोलीस ठाण्यापर्यंत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पायी निषेध मोर्चा काढून निषेध करण्यात आला. तसेच पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना निवेदन दिले. यावेळी संतोष भंडारी, मुजफ्फर कुरेशी, विनोद भालेराव, सुभाष पवार, राजेंद्र जगदाळे, विश्वास ढमढेरे विद्या भुजबळ, मयुर थोरात यासह कार्यकर्त्यांनी या निनावी पत्राचा निषेध करुन तात्काळ कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

 

काय म्हटलेय पत्रात ?

या पत्रात आमदार अशोक पवार (NCP MLA Ashok Pawar) यांचा महेंद्र मल्लाव (Mahendra Mallav) करण्याची धमकी देण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वीच शिरुरचे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची भर चौकात दिवसा हत्या करण्यात आली होती.
त्यामुळे आमदार अशोक पवार यांनाही भर चौकात जीवे मारण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
या धमकी पत्रानंतर शिरुर हवेली मतदारसंघात (Shirur Haveli constituency) तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

 

Web Title :- NCP MLA Ashok Pawar | shirur haveli ncp mla ashok pawar threatened to kill

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Unlock | राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना, मुख्यमंत्र्यांकडून निर्बंध शिथील

Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ ! …तर अटक वॉरंट निघणार?

Chandrakant Patil | ‘माझ्या मनात शरद पवारांबद्दल अनादर कधीच नव्हता, एकेरी उल्लेख अनावधानाने, चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण