शिवसेनेच्या माजी महापौरांच्या मदतीला राष्ट्रवादीचे आमदार !

खोट्या गुन्ह्याच्या चौकशीची एसपींकडे मागणी

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – कोतवाली पोलीस ठाण्यात माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा खोटा आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनातून केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व इतर यांचेवर जागेच्या वादावरुन खोटा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे. फुलसौंदर यांची पार्श्वभूमी तपासल्यास सदरची व्यक्ती ही राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करते. तसेच ऐतिहासिक अहमदनगर शहराचे प्रथम महापौर म्हणून त्यांनी पद भूषवलेले आहे. त्यांचे समाजात चांगले स्थान आहे. त्यामुळे त्यांचेवर जो खोटा गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबत योग्य ती चौकशी करावी व त्यांचेवर अन्याय होणार नाही, याचीही आपण सहानभुतीपुर्वक विचार करुन जिल्हा पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच यापुढे एखाद्या राजकीय, सामाजिक, व्यापारी, प्रतिष्ठीत व्यक्ती यांची कारकिर्द संपविण्याच्या दृष्टिने असले प्रकार घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांचेवर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याबाबत योग्य ती चौकशी करावी, असे आ. जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेच्या मार्गावर असल्याचे वृत्त यापूर्वी ‘पोलीसनामा’ने प्रसिद्ध केले होते. आता जगताप हे शिवसैनिकांच्या मदतीला आल्यामुळे या चर्चेत आणखी भर पडली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like