राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारास कोरोनाची लागण, जिल्हाध्यक्षांनी स्वतः फेसबुक पोस्टव्दारे दिली माहिती

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन  –   राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांना शुक्रवारी रात्री प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले. तिथे त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती आमदार दुर्रानी यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून पोस्ट केली. आमदार बाबाजानी दुर्रानी काही दिवसांपूर्वी लग्नासाठी नांदेडला गेले होते. नांदेड येथून परतत असताना त्यांना फ्लूदृश्य काही लक्षणे जाणवली. पाथरी येथे पोचल्यावर आमदार दुरानी यांनी इतरांपासून स्वतःला (Quarantine) विलग्नवास केल्याचे कळते. शुक्रवारी रात्री आमदार बाबाजानी दुर्रानी यांना प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी औरंगाबाद येथे रवाना झाले त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता पॉझिटिव्ह आढळून आली अशी माहिती आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट द्वारे पोस्ट केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या हितचिंतक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला ते म्हणाले प्रिय सहकार्‍यांनो ताप व फ्लू दृश्य लक्षणे जाणवत असल्याने कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आल्याचे कळते औरंगाबाद येथे मी उपचार घेत आहे माझी प्रकृती स्थिर आहे. कोणीही काळजी करू नये आपले प्रेम व सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत त्या जोरावर लवकरच परत बरा होऊन येईल असा संवाद आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हितचिंतक व कार्यकर्त्यांशी साधला.

आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी स्वतःला (Quarantine) विलग्नवास करण्यापूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना पाथरी शहरातील शिवाजीनगर येथील शांताबाई नखाते महाविद्यालयात (Quarantine) विलग्नवास केले जाणार आहे यात बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मायदळे, वसीम इंजिनियर, पाथरी नपचे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे वरील संपर्कात आलेल्यांना (Quarantine) विलग्नवास करण्यात येणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे

प्रिय सहकाऱ्यांनो,

सर्दी, ताप असल्या कारणाने मी कोविड-१९ची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळले. औरंगाबाद येथील रुग्णालयात मी उपचार घेत आहे, आता माझी प्रकृती एकदम स्थिर असून कोणीही काळजी करू नये. आपल्या सर्वांचे असंख्य आशीर्वाद व सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत, त्या जोरावर लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन परत येईल.

तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, त्याबद्दल मी ऋणी आहे परंतु कोणीही मला संपर्क करण्याचा व भेटण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. तुम्ही सर्वजण आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, विनाकारण घराबाहेर पडू नका आणि प्रशासनास सहकार्य करा.