NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी (NCP MLA Babajani Durrani) हे पाथरी येथील जुम्मा मस्जिद स्मशानभूमीत (Jumma Masjid Cemetery) अंत्यसंस्कारासाठी गेले असताना आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats) दिली. ही घटना गुरुवारी, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. आमदार बाबाजानी दुर्राणी स्मशानभूमी परिसरात एका बाकावर बसले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते होते.

 

NCP MLA Babajani Durrani | NCP MLA Babajani Durrani threatened to be shot dead; Huge excitement
File Photo

 

फिर्यादीत नमूद ठिकाणी आरोपी मोहम्मद बिन सईद बिन किलेब (Mohammed bin Saeed bin Kileb) यांनी फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून रिवाल्वरने ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पाथरी पोलिसात (Pathari police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.

 

पाथरी पोलीसात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. या घटनेचे वृत्त संपूर्ण शहरात पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माजलगाव रोड, बाबा टॉवर, पंचायत समिती, साई रोड, मेनरोड येथील व्यापाऱ्यांची दुकाने बंद होत होती. या घटनेचा निषेध करत शहरातील व्यापाऱ्यांनी महसूल प्रशासनाला निवेदन दिले आहे.

 

Web Title :- NCP MLA Babajani Durrani | NCP MLA Babajani Durrani threatened to be shot dead; Huge excitement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा