राष्ट्रवादीला मोठा धक्का ! पिचडांनंतर ‘हे’ माजी प्रदेशाध्यक्ष NCP ची साथ सोडणार, उध्दव ठाकरेंशी तासभर चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गळती थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भास्कर जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यास राष्ट्रवादीला कोकणामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते भाजपा-शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मात्र, शिवसेनेने विजयी होऊ शकणाऱ्यांनाच शिवबंधन बांधण्याचे काम वेगात सुरु केले आहे. या आठवड्यामध्ये बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. तसेच राष्ट्रवादीचे दोन आमदार शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. मात्र, त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. याचा सर्वात जास्त फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर काही नेते पक्ष बदलण्याच्या मार्गावर आहेत. येत्या काही दिवसात अनेक नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपा-शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जातयं. दरम्यान, भास्कर जाधव हे कोकणातील वजनदार नेते असून रत्नागिरीतील राष्ट्रवादीचा मोठा चेहरा आहे. मात्र, भास्कर जाधवही आता शिवबंधन बांधणार असल्याचं समजते.

आरोग्यविषयक वृत्त –