गोव्याच्या विधानसभेत मराठी ऐकून राष्ट्रवादीच्या आमदाराची बोटं कानात !

पणजी : वृत्तसंस्था – गोवा विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराच्या कृतीने मुख्यमंत्र्यांसह सर्वच आमदार चकित झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) आमदार सुदिन ढवळीकर यांनी मराठीत भाषण सुरु करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी कानात बोटे घातली. त्यानंतर त्यांनी आपल्याला मराठी समजत नसून कोंकणी भाषेत याचे भाषांतर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मुख्यमंत्र्यांना एक पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त सभागृहात आमदार सुदीन ढवळीकर हे मुख्यमंत्र्यांचे आभार मानत त्यांनी मराठीत भाषण सुरु करत ‘सभापती महोदय, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे..’ असे म्हटल्यानंतर तात्काळ चर्चिल आलेमाव यांनी त्यांना थांबवत आपल्याला मराठी समजत नसून याचे कोंकणी भाषेत भाषांतर करण्याची मागणी केली. त्यावर सभापतींनी त्यांना खाली बसवत नंतर मी तुम्हाला याचे भाषांतर करतो असे सांगितले. त्यानंतर काँग्रेसचे जेष्ठ आमदार प्रतापसिंग राणे यांनी देखील मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी चर्चिल आलेमाव यांना मराठी येत असल्याचे सांगतानाच त्यांनी सभागृहात ‘ये रे ये रे पावसा’ ही कविता सादर केली होती, असेदेखील सांगितले.

दरम्यान, चर्चिल यांना सभापतींनी समजावून सांगताना लवकरच दुभाषी नेमण्याचे आश्वासन देऊन खाली बसवले.

आरोग्यविषयक वृत्त –