NCP MLA Dhananjay Munde | शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडे म्हणाले-‘भाजपाचा आधार घेणं…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MLA Dhananjay Munde | राज्याच्या राजकारणामध्ये 2 जुलै 2023 ला मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) मंत्रीपदाची शपथ घेतली. या बंडानंतर (NCP Rebellion) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणि राज्याचे कृषीमंत्री (Agriculture Minister) धनंजय मुंडे (NCP MLA Dhananjay Munde) यांनी केलेल्या बंडखोरीवर भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात मुंडे बोलत होते.

शरद पवारांचा (Sharad Pawar) आधार सोडण्याची वेळ का आली? ईडी (ED), सीबीआयच्या (CBI) नोटीसांमुळे भाजपसोबत (BJP) गेलात का? या प्रश्नावर धनंजय मुंडे म्हणाले, शरद पवार हे आमचा आधार आणि दैवत आहेत. पण, भाजपाचा आधार घेणं किंवा बरोबर जाणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घेतलेली भूमिका आहे. 5 जुलै रोजी झालेल्या मेळाव्यात अजित पवार (NCP MLA Dhananjay Munde) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, असे मुंडे यांनी सांगितले.

ईडी, इन्कम टॅक्सच्या नोटीसा (Income Tax Notice) आज नाहीतर, गेल्या अनेक वर्षापासून आल्या आहेत. परंतु, याच्या भीतीने आम्ही भाजपसोबत गेलो, हे लोकांमध्ये पसरवले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीत स्वाभीमान हा विषय होता. हा पक्ष लोकशाही (Democracy) मानणारा आहे. आमच्यासाठी दैवत आणि आधारस्तंभ शरद पवारच आहेत. लोकप्रतिनिधींची कामे आणि मतदारसंघाचा विकास होणे याला आमदार म्हणून आम्ही उत्तरदायीत्व आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

तुम्ही दैवताला देवाऱ्यातून बाहेर काढलं आणि देवाऱ्यावर अर्थात पक्ष, चिन्हावर दावा केला,
असं विचारलं असता धनंजय मुंडे म्हणाले, देव देवाऱ्यात आणि मनात आहे. देवाऱ्यात जाऊन पूजा करु नका,
हे देवाने सांगितलं, तरी भक्त देवाचं मंदिर मनात करुन पूजा करत असतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या