राष्ट्रवादीचे दिलीप सोपल बुधवारी शिवसेनत !

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या आमदारकीचा राजिनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बगाडे यांच्याकडे औरंगाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सोपल यांनी राजिनामा दिला. स्वखुशीने दिलेला राजिनामा त्वरीत मंजूर करण्यात आला आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर यांच्यासह दिलीप सोपल यांचे निकटवर्तीय हजर होते.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले दिलीप सोपल यांनी आमदारकीचा राजिनामा दिल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आपल्या वैयक्तिक कारणामुळे राजिनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बगाडे यांनीही सोपल यांचा राजीनामा मंजूर केला आहे.  दिलीप सोपल बुधवारी (दि.२८) कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीली सोडचिठ्ठी दिल्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशा नंतर आता दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला मोठ्ठा धक्का मानला जात आहेत. दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक महत्त्वाची पदे दिली होती. त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत असे शरद पवार आणि अजित पवार यांना वाटत होते. मात्र, दिलीप सोपल यांनी शिवसेनेत जाणाच्या निर्णय घेतल्याने त्यांचा विश्वास फोल ठरला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like