राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक

कोल्‍हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मातोश्री श्रीमती सकिनाबी मियालाल मुश्रीफ यांचे शुक्रवारी (दि. ११) सकाळी निधन झाले. कागल येथे आज सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्‍कार होणार आहेत. हसन मुश्रीफ यांच्या मातोश्रीचे निधन झाल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्‍यक्‍तिनी आमदार यांची भेट घेतली.
निवृत्त पोलिस कमिशनर शमशुद्दीन मुश्रीफ, माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ कागलचे माजी नगरसेवक अन्‍वर मुश्रीफ यांना भेटून अनेक व्‍यक्‍तिनी दु:ख व्यक्‍त केले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.