मनसेचं महाअधिवेशन सुरू असतानाच राष्ट्रवादीं केला ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन सुरु आहे. राज ठाकरे यांनी या अधिवेशनामध्ये आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. झेंड्याचा रंग भगवा केल्यानंतर मनसे आता आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशातच राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटवर राष्ट्रवादीने घणाघाती टीका केली आहे.

कोणता झेंडा घेऊ हाती, अशी व्यवस्था राज ठाकरे यांची झाली आहे. शॅडो कॅबिनेट म्हणजे लहान माझी बाहुली तिची मोठी सावली असा प्रकार आहे. सभांना होणारी गर्दीचे कार्यकर्त्यांमध्ये कसे रुपांतर होईल याकडे राज ठाकरे यांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच एकांगी कारभार करण्याची सवय असले तर पदाधिकाऱ्यांची फळी उभी करता येत नाही हे गणित त्यांनी समजून घ्यावे असा खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हमेंत टकले यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मनसेच्या नव्या अवतारावर बोलताना म्हणाले, मनसेनी पक्षाच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर करणे गैर आहे. अमित ठाकरे यांची राजकारणात झालेली एन्ट्री हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. कोणास संधी द्यावी हे त्यांनी ठरवावे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like