NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या, मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांचे तत्कालीन अंगरक्षक (Bodyguard) वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी निळते ते तळोजा दरम्यान उपनगरी रेल्वे खाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या (Committed Suicide) केली. ही घटना बुधवारी (दि.29) सकाळी नऊच्या सुमारास घडली. ‘पोलीस आणि मीडियाला एकच विनंती आहे, मी आरोपी नाही’ असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवत कदम यांनी आत्महत्या केली. या प्रकरणावर भाजप नेते मोहित कंबोज (BJP leader Mohit Kamboj) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. ही आत्महत्या नसून हत्या (Murder) असल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

अभियंता अनंत करमुसे प्रकरणी (Anant Karamuse Case) ठाणे पोलिसांकडून (Thane Police) गेल्या काही दिवसांपासून वैभव कदम यांची चौकशी सुरु होती. करमुसे प्रकरणात चौकशीसाठी वारंवार बोलावून मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. हाच धागा पकडून मोहित कंबोज यांनी वैभव कदम माफीचा साक्षीदार होणार असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे. कंबोज यांच्या दाव्याने खळबळ उडाली असून गृहविभागाने यात तातडीने लक्ष घालून आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

काय म्हणाले मोहित कंबोज?

मोहित कंबोज यांनी ट्विट करुन याप्रकरणाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हेड कॉन्स्टेबल वैभव शिवाजी कदम आज सकाळी मृतावस्थेत सापडले.
महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट मंत्र्यांच्या संरक्षणासाठी ते काम करत होते आणि एका प्रकरणात ते आरोपी होते.
एका हाय प्रोफाइल प्रकरणात कदम साक्षीदार होणार होते. इट इज अ क्लिअर कट मर्डर नॉट सुसाईड,
मी एक्स्पोज करणार, असं कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कंबोज यांनी एक व्हिडिओ शेअर करत या प्रकरणाचा तपास एफआयआर (FIR) दाखल करावी,
अशी मागणी केली आहे. हे प्रकरण आत्महत्या नसून हत्या आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren),
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रमाणेच हे प्रकरण असल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे.
तसेच वैभव कदम हे साक्षीदार बनून मोठा खुलासा करणार होते, म्हणून तर त्यांचा खून झाला नाही ना?
असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title :- NCP MLA Jitendra Awhad | BJP mohit kamboj comment on jitendra awhad former boduguard vaibhav kadam ends life

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

AFINDEX-23 | भारत- आफ्रिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव, AFINDEX-23 चा पुण्यात समारोप

Devendra Fadnavis On Girish Bapat | जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले! खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

MP Girish Bapat Passed Away | भाजप खासदार गिरीश बापटांच्या निधनानं राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर, सांगितल्या जुन्या आठवणी