NCP MLA Jitendra Awhad | न्यायालयाच्या निकालावर टिपणी करणे म्हणजे…, जितेंद्र आव्हाडांची विधानसभा अध्यक्षांवर टीका (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल (Maharashtra Political Crisis) देताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत (16 MLAs Disqualification) निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. न्यायालयाचा निकाल लागला त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) हे परदेशात होते. परदेशातून आल्यावर त्यांनी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये त्यांनी तेव्हाचा राजकीय पक्ष कोणाच्या ताब्यात होता, व्हीप कोण होता आदींसह शिवसेनेचे संविधान (Constitution of Shiv Sena) तपासणार असल्याचे म्हटले होते. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. कोर्टाने अधिकार दिले म्हणून त्यांच्या निकालावर टिपणी करणे म्हणजे एक बाजू घेणे होते, असे आव्हाड  यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीपणी करणे म्हणजे शिंदे गटाची (Shinde Group) बाजू घेणे आहे. ज्या पदावर ते आहेत, सुप्रीम कोर्टाचे म्हणणे त्यांचे म्हणणे या दोन्ही गोष्टींमध्ये विरोधाभास आहे. कोर्टाने स्पष्टपणे तुम्हाला मर्यादा आहे, असे म्हटले आहे. कोर्टाने पक्षातील फूट नाकारली आहे. ते नाही म्हटल्यावर काय उरतेय, असा सवाल जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केला.

राजकीय पक्षानेच व्हीप (Whip) आणि नेत्याची नेमणूक करायची असे सुप्रीम कोर्टाच्या निकालात सांगण्यात
आले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर विधानसभा अध्यक्षांनी टीका-टिप्पणी करणे म्हणजे
त्यांनी एका बाजूला सरकण्यासारखे आहे, असा शेरा त्यांनी मारला. तसेच विधानसभा अध्यक्षांनी एका बाजूने विचार
न करता सर्वोच्च न्यायालयाला जे अभिप्रेत आहे त्यापद्धतीने वागावे, अशी अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

आव्हाड पुढे म्हणाले, कोण राजकीय पक्ष होता? महाराष्ट्राला मूर्ख समजता का? शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे
फेब्रुवारीमध्ये गेला. 22 जुलैला त्यावरुन निर्णय कसा लावणार, असा सवाल त्यांनी केला.
तसेच मला आश्चर्य वाटतेय त्यांच्या सराखा सुशिक्षित चतुर असे कसे काय बोलू शकतो? हे रुल बुक आहे.
नार्वेकर तर मोठे वकील आहेत, आम्ही अनपढ आहोत, अशी टीका त्यांनी केली.

Web Title :  NCP MLA Jitendra Awhad | how can educated smarts like rahul narvekar talk jitendra awhads criticism on 16 mlas disqualification statement of eknath shinde uddhav thackeray crisis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून 23 जणांची 43 लाखांची फसवणूक; क्लिक अँड ब्रश कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

ACB Trap News | बिल्डरकडून 2 लाखाची लाच घेणारा वरिष्ठ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Police Crime News | घोरपडे पेठेत क्रिकेट खेळणार्‍या युवकांनी सोनसाखळी चोरास पाठलाग करून पकडले; ACP सतीश गोवेकर, Sr PI संगीता यादव यांच्याकडून धाडसी तरूणांचा सत्कार