NCP MLA Jitendra Awhad | जाहीर मेळाव्यात कार्यकर्त्यांनी झळकावले अजित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्र्या’चे banner, जितेंद्र आव्हाड म्हणाले-‘निवडणुका लागू द्या मग…’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणात (Maharashtra Politics News) कधी काय होईल याचा नेम नाही. एकीकडे शिवसेना (Shivsena) फोडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले तर दुसरीकडे अजित पवारांच्या (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्रीपदाचे फ्लेक्स लावत आहेत. आज नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी जाहिर मेळाव्यात अजित पवार ‘भावी मुख्यमंत्री’ (Future Chief Minister) असे बॅनर झळकले. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी भाष्य केले आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) बोलत होते.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
मुख्यमंत्री कुठेही गेले तरी म्हणतात सहा महिन्यांपूर्वी मी बॅटिग केली. मात्र तुम्ही खंजीर खुपसला. महिलेला बाजूला सरकावले तर 354, आमच्या मुलांनी फटके मारले तर 307 असा अन्याय सध्या सुरु आहे. 50 खोके म्हटलेले तुम्हाला का लागतय? असं म्हणत आव्हाड यांनी 50 खोकेच्या घोषणा दिल्या. जनता वाट बघते आहे कधी निवडणुका लागतात. कधी तुम्ही मैदानात येता. यावेळी निवडणुका लागू द्या मग अजित दादा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी व्यक्त केला.
कोर्टाच्या नपुंसकर सरकार या विधानावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) निशाणा साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले,
महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्याबद्दल काय म्हटले? हे सरकार नपुंसक आहे.
जाती धर्मात तेढ लावून आपले हित साध करण्याचे काम सुरु आहे. वर मोदीसाहेब, खाली फडणवीस-शिंदे साहेब हिंदुत्ववादी आहे.
हिंदूंना भडकवण्यासाठी हिंदू मोर्चा निघत आहेत. अजित दादा किंवा आम्ही असताना असे कधीच झाले नाही.
तुमच्या सरकारमध्ये हिंदू सुरक्षित नाही असे का? पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांना मुख्यमंत्री आणि अजित दादांना उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी आव्हड यांनी केली.
Web Title :- NCP MLA Jitendra Awhad | jitendra avhad reaction on ajit pawar the future chief minister nashik
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | जुन्या कात्रज घाट रोडवरील हॉटेल तोरणाजवळ युवकाच्या खुनाचा प्रयत्न