NCP MLA Jitendra Awhad | ‘… तोपर्यंत अटक कारवाई करु नका’, न्यायालयाचे पोलिसांना निर्देश; जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाचा दिलासा, पण…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची (Molestation) तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आव्हाड यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी (Anticipatory Bail) अर्ज केला असुन उद्या (मंगळवार) सकाळी 11 वाजता या अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे 11 वाजेपर्यंत अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटकेची (Arrest) कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश कोर्टाने पोलिसांना (Thane Police) दिले आहेत, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad) यांनी दिली आहे.

 

मंगळवारी (दि.15) सकाळी 11 वाजता जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात (Thane Court) सुनावणी होणार आहे. न्यायाधीश पी. एम. गुप्ता (Judge P. M. Gupta) यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. यानंतरच आव्हाड यांना दिलासा मिळणार का नाही, हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, ऋता आव्हाड यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याला (Mumbra Police Station) एक पत्र लिहिलं आहे. तक्रारदार महिलेला पोलीस संरक्षण (Police Protection) मिळावं म्हणून खोटे राजकीय आरोप करु शकते. आव्हाड यांच्या नावाने तक्रारदार महिलेला धमकीचा फोन जाऊन खोटी तक्रार होऊ शकते, असं ऋता आव्हाड यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. अशी काही तक्रार आली तर चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.

काय आहे प्रकरण?
कळव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला.
या कार्यक्रमामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हात लावून बाजूला केलं.
यानंतर महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

 

Web Title :- NCP MLA Jitendra Awhad | jitendra awhad molestation allegations anticipatory bail in thane court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Stand-Up Comedian Veer Das | स्टँड-अप कॉमेडियन वीर दासने पुन्हा रद्द केला शो, कारण ऐकुन तुम्हालाही य़ेईल हसु

Actress Neha Sharma | नेहा शर्माच्या बोल्ड स्टाइलसमोर या अभिनेत्री पडतात फिक्या, पहा तिचा हॉट लुक

Chandrashekhar Bawankule | ‘जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल व्हायला हवेत’ – चंद्रशेखर बावनकुळे