राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी जितेंद्र आव्हाड ‘मातोश्री’वर !

मुंबई : वृत्तसंस्थ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळख असणारे आणि शिवसेना भाजपवर टीकास्त्र सोडणारे जितेंद्र आव्हाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. मात्र, या दोघांची भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी होती हे मात्र अद्याप समजू शकले नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc6cb8ee-cdfc-11e8-9313-9dab31b7df25′]

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी आज उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड हे विरोधी पक्ष अर्थात राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आहेत. त्यांनी सातत्याने शिवसेना-भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. विशेषत: शिवसेनेच्या भूमिकेवर ते नेहमीच सडकून टीका करतात. शिवाय सामनातूनही आव्हाडांवर बोचरे वार केले जातात. मात्र तेच जितेंद्र आव्हाड आज ‘मातोश्री’वर गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d3252642-cdfc-11e8-bf37-edf3eb147bf7′]

बहुतेक जितेंद्र आव्हाड पहिल्यांदाच ‘मातोश्री’वर गेले. आव्हाड यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याचं म्हटलं आहे. मात्र याबाबत राजकीय अर्थ काढले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी मुंबईत बैठक होत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक नियोजित आहे. मात्र त्या बैठकीला जाण्यापूर्वी आव्हाड हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले. जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या जवळचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीच्या दृष्टीने काँग्रेसशी चर्चा सुरुच आहे. शिवाय भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याबाबतची भूमिका पवारांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आव्हाड-ठाकरे भेट होती का, असा प्रश्न आहे.