NCP MLA Jitendra Awhad | मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना सुप्रीम कोर्टाचा दणका, न्यायालयाने बजावली नोटीस

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांना सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) नोटीस बजावली आहे. अनंत करमुसे (Anant Karmuse) या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांना नोटीस बजावली आहे.

 

घोडबंदर कावेसर येथे राहणाऱ्या अनंत करमुसे या तरुणाने 5 एप्रिल 2020 रोजी जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्या विरोधात प्रसार माध्यमावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर आव्हाडांच्या सुरक्षारक्षक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्याला अपहरण (Kidnapping) करुन आव्हाडांच्या निवासस्थानी नेले होते. येथे करमुसे याला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे आव्हाडांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता न्यायालयाने त्यांना नोटीस (Notice) बजावली आहे. या याचिकेत ठाणे पोलीस (Thane Police) आव्हाडांना सहकार्य करत असल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाची (Anant Karmuse Beating Case) सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) CBI चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

 

या याचिकेवर 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची (CBI Inquiry) मागणी केली गेली आहे.
जितेंद्र आव्हाड यांना या प्रकरणात ठाणे पोलिसांनी 14 ऑक्टोबर 2021 ला अटक (Arrest) देखील केली होती.
त्यांना ठाणे न्यायालयात (District & Sessions Court, Thane) हजर करण्यात आले होते.
न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली होती.
करमुसे यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात (Vartak Nagar Police Station) गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात पोलिसांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना देखील अटक केली होती. पोलिसांनी त्यांना जबाब नोंदवून ठाणे न्यायालयात हजर केले होते.
न्यायालयात त्यांचा 10,000 रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

 

Web Title :- NCP MLA Jitendra Awhad | supreme court notice issue jitendra awhad over anant karmuse beaten case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP on Shivsena | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हात लावला तर तलवारीने…, NCP आमदाराने थेट मित्रपक्ष शिवसेनेलाच दिला इशारा

Pune Crime | फसवणुकीच्या गुन्ह्यात कपील धिंग्रा आणि त्यांच्या पत्नीला जामीन मंजूर

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या विश्वासू सहकार्‍याची भाजपाशी सलगी, नार्वेकर म्हणतात, ‘अमित शाहजी देव करो तुम्हाला…’