NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना मोठा झटका, विवियाना मॉल मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांना जामीन (Bail) मिळणार की तुरुंगात जावं लागणार यावर आज (शनिवार) न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. न्यायालय परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू नये याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी केली.

 

 

पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) पोलीस तपासासाठी सहकार्य़ करत नसल्याचा दावा केला आहेत. तसेच आव्हाडांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. सुनावणी घेताना न्यायाधीश बी.एस. पाल (Judge B.S. Pal) यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. सध्या आव्हाड पोलीस कोठडीत असून थोड्याच वेळात या प्रकरणी निकाल येणे अपेक्षित आहे.

 

काय आहे प्रकरण?

माजी खासदार संभाजी छत्रपती (Former MP Sambhaji Chhatrapati) यांनी ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील आक्रमक झाले आहेत. या चित्रटांमध्ये शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात (Vartaknagar Police Station) वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील (Chhatrapati Shivaji Maharaj) आधारित चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शीत झाला आहे. मात्र या चित्रपटाला आता विरोध केला जात आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall) जाऊन आंदोलन करुन शो बंद पाडला.
यावेळी एका प्रेक्षकाने तिकिटाचे पैसे परत द्या आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का,
अशा शब्दात मॉल चालकाला सुनावले. यावेळी प्रेक्षकाची समजूत काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.
मात्र, संतप्त झालेल्या प्रेक्षकाने त्यांचे ऐकले नाही. अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या प्रेक्षकाला मारहाण (Beating) केल्याची घटना घडली.

 

 

Advt.

Web Title :- NCP MLA Jitendra Awhad | thane court on ncp mla jitendra awhad bail application in beating case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Siddhant Vir Suryavanshi | सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

CM Eknath Shinde | ‘मी केलेल्या उठावाची दखल जग घेतंय…’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टाकली गजानन किर्तीकरांवर मोठी जबाबदारी

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला लाखोंचा गंडा, आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची नवी शक्कल