अजित पवारांसोबत असलेल्या आमदार कोकाटेंनी केलं ‘हे’ Tweet, सांगितलं मी शरद पवारांसोबतच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज पुन्हा भाजपने सरकार स्थापन केले, ट्विस्ट मात्र एवढाच होता की भाजपचे सरकार स्थापन करण्यास राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी पाठिंबा दिला. एवढेच नाही तर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देखील घेतली. भाजप सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटल्याचे सांगण्यात येत होते. यातच नाव होते ते माणिकराव कोकाटे यांचे.

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा 3 आमदार राष्ट्रवादीबरोबर परत आल्याचे दिसले होते. त्यानंतर आता सांगण्यात येत आहे की 8 आमदार परतले आहेत, त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला आहे की आता काय फक्त अजित पवार एकटेच भाजपला पाठिंबा देणार का?

अजित पवारांबरोबर राजभवनावर गेलेल्या माणिकराव कोकाटे यांनी आपण राष्ट्रवादी बरोबर आणि शरद पवारांबरोबर असल्याचे ट्विट करुन सांगितले. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही, अजितदादांच्या सांगण्यावरुन मी राजभवनावर गेलो होतो. गटनेते असल्याने आदेश पाळला….! तिथे काय होईल माहीत नव्हते. मी पक्षाशी एकनिष्ठ राहील.

https://twitter.com/KokateManikrao/status/1198174957685149696

मी सदैव साहेबांसोबत राहील याची ग्वाही देतो, गैरसमज करुन घेऊ नका असे ट्विट देखील कोकाटे यांनी केले आहे.

https://twitter.com/KokateManikrao/status/1198196440348200960

आता आमदार दिलीप बनकर हे राजभवानावर गेले होते. ते देखील राष्ट्रवादीकडे पुन्हा परतले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची चर्चा रंगली आहे. भाजपला सत्ता स्थापनेसाठीचे बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी राज्यपालांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने सरकार तर स्थापन केले परंतू बहुमत सिद्ध करण्यात भाजप यशस्वी होणार का हे पाहावे लागेल.

Visit : Policenama.com