राष्ट्रावादीचे विदर्भातील एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर ?

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप शिवसेनेची वाट धरली आहे. त्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपले आमदार नेते सांभाळणे अवघड जात आहे. त्यात आता विदर्भातील राष्ट्रावादीचे एकमेव आमदार मनोहरराव नाईक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

आज पुसद येथील नाईकांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. ही बैठक मनोहरराव यांचा लहान मुलगा इंद्रनील यांच्या नेतृत्वात होत आहे. तसंच यंदा विधानसभा निवडणुकीत मनोहरराव यांनी माघार घेणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर कोणाला टिकीट मिळणार हा चर्चेचा विषय आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून मनोहरराव यांच्ये दोन्ही मुलं ययाती आणि इंद्रनील यांच्यात मतभेद झाले आहेत.

मनोहरराव यांचे धाकटे चिरंजीव इंद्रनील यांना मनोहरराव यांचा पाठिंबा असून त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा अनिता नाईक यांनी ययाती यांना पाठिंबा दिल्याची चर्चा पूसदमध्ये आहे. त्यामुळे राष्ट्रावादी कोणाला टिकीट देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दोन्ही मुलांमधील इंद्रनील हे सेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंद्रनील यांनी मुंबईत गेल्यावर मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे तेथे त्यांनी शिवसेना प्रवेशाची चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे इंद्रनील स्वतः शिवसनेत जाणार असून त्यांच्यासोबत वडिल मनोहरराव नाईक आणि त्यांचे समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश करावा असा हट्ट आहे. त्यासाठी आज झालेली बैठक त्या संदर्भात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोहरराव यांची प्रकृती ठिक नाही. त्यामुळे ते विधानसभेच्या पावसाळी आधिवेशाला उपस्थित राहु शकले नाही. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुक पुन्हा लढवणार नसल्याचे याआधी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर कोणाता पक्ष कोणाला तिकीट देतो हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –