राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार हरविल्याची तक्रार पोलिसांकडे, मतदार संघात प्रचंड ‘खळबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा हे बेपत्ता झाले आहेत. त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी भल्या सकाळी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा हरविल्याची तक्रार पोलिस दप्तरी दाखल करण्यात आली आहे.

दौलत दरोडा यांच्या मुलाने वृत्त वाहिन्यांना मुलाखत दिली असून आमदार दौलत दरोडा हे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आ. दौलत दरोडा हे अजित पवारांसोबत राजभवनात उपस्थित होते. दरोडा हे शपथविधीला उपस्थित होते. त्यानंतर दरोडा यांच्या मुलाने त्यांना अजित पवार यांना शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचा मेसेज केला. तेव्हापासुन दौलत दरोडा हे बेपत्ता आहे. दरोडा यांच्या मुलाने आ. दौलत दरोडा यांना परत या असे थेट आवाहन केले आहे. दौलत दरोडा हे शहापूरचे आमदार असून प्रचारादरम्यान सर्वच पक्षाने आम्हाला मदत केली असल्याचे दरोडा यांच्या मुलाने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. आम्ही पवार साहेबांच्या सोबत आहोत असे दरोडा यांच्या मुलाने टीव्हीवर सांगितले आहे.

Visit : Policenama.com