शिवसेनेच्या नेत्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अक्षरशः रडले !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ वर्षे ते नगरचे आमदार होते. शिवसेनेचा वाघ असाच त्यांचा लौकिक होता. मोबाईल आमदार म्हणून त्याची ओळख होती. सभा सुरु असताना सुद्धा ते मोबाईल रिसिव्ह करत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नगर शहरात येऊन इतकी वर्षे त्यांनी जनसेवा केली.

दरम्यान, अनिल राठोड यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर आज नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अंत्यसंस्कारानंतर स्थानिक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी सुद्धा राठोड यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांच्याबद्दल बोलताना लंके यांना अश्रू अनावर झाले.

निलेश लंके यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले, “अनिलभैया राठोड हे आमचे सर्वांचे दैवत होते. ती एक आगळीवेगळी शक्ती होती. त्यांनी नगर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला उभं करण्याचं, त्यांना ताकद देण्याचं काम केलं. त्यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो. भैयांच्या आशीर्वादाने आज मी आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेकडून निवडणूक लढत असताना सुद्धा त्यांचे आशीर्वाद मला होते. नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीयांच्या, शेतकरी बांधवांच्या व जनतेच्या वतीने मी भैयांना आदरांजली अर्पण करत” असे त्यांनी यावेळी म्हटलं.

राठोड यांच्या अंत्यसंस्कारावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला. फुलांनी सजवलेल्या रुग्णवाहिकेतून राठोड यांचे पार्थिव अमरधाम येथे आणण्यात आले. त्यावेळी ‘अमर रहे अमर रहे, अनिल भैया अमर रहे’ अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like