राष्ट्रवादीला मोठा धक्‍का ! ‘हा’ आमदार शिवसेनेच्या वाटेवर

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे आमदार पाडुरंग बरोरा यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनंतर पाडुंरंग बरोरा हे आता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. बरोरा यांचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी जवळचे संबंध आहेत. यामुळे बरोरा हे सेनेत प्रवेश घेतील या चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, शहापूरचे बरोरा कुटुंब हे १९८० पासून पवार कुटुंबासोबत होते. मात्र त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी पासून फारकत घेतली आहे.

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

Loading...
You might also like