शरद पवारांच्या जवळच्या नातेवाईक आमदाराची ‘शिवस्वराज्य’ यात्रेला ‘दांडी’, भाजप प्रवेशाची चर्चा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक असलेले पितापुत्र पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह यांच्या उस्मानाबादेत पोहचलेल्या शिवस्वराज्य यात्रेला असलेल्या अनुपस्थितीमुळे पितापुत्राच्या भाजप प्रवेशाची चर्चाने जोर धरला आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह यांनी अनुपस्थिती लावली.

पाटील पितापुत्राच्या अनुपस्थितीमुळे त्यांचे भाजपमध्ये जाण्याचा निर्धार पक्का असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लोकसभेत निवडणूकीत राणा जगजितसिंह यांना राष्ट्रवादीकडून तिकिट देण्यात आले होते. मात्र पराभव झाल्यानंतर लगेचच ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे आता दोघेही राष्ट्रवादीच्या यात्रेत सहभागी न झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता बळावली आहे.

विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीतून आऊंटगोईंनची मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. त्यामुळे पक्षाला चांगलीच गळती लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी देखील भाजपचीच भूमिका अवलंबणार आहेत. यासाठी भाजपचा एखादा असंतुष्ट नेता गळाला लागतो का याचा शोध राष्ट्रवादीकडून सुरु आहे. तसेच राष्ट्रवादी तरुणांना संधी देऊन पक्षांतर केलेल्या नात्यांना पराभूत करण्यावर राष्ट्रवादीचा भर असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –