लग्नापूर्वीच एवढी भांडणं तर पुढं संसारचं वाटोळं ? : आमदार रोहित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विनिधानसभा निवडणुकीचा निकाल लागून गेल्यानंतर सत्ता स्थापनेसासाठी युती सरकारला वेळ लागत आहे, याचे कारणही तसेच आहे. भाजप शिवसेनेच्या सत्ता स्थापनेत शिवसेना समसमान पदांवर अडून बसली आहे. त्यामुळे विरोधकांकडून युतीवर निशाणा साधला जातोय.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यावेळी शिवसेनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात मला बाळासाहेब ठाकरेंचा नितांत आदर आहे. कारण त्यांच राजकीय वजन हे खूप मोठं होत. निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेला सत्तेत समान वाटा मिळेल असा शब्द दिला होता मात्र भाजप सध्या ज्या प्रकारे आपला शब्द फिरवत आहे ते पाहून असा प्रश्न पडतो की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर भाजपच एवढं साहस झालं असत का ? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

या आधी देखील आपण शिवसेना आणि भाजपला एकमेकांवर कुरघोडी करताना अनेकदा पाहिले आहे. शिवसेनेकडून भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील मोठ्या प्रमाणावर या आधी करण्यात आलाय. त्यामुळे यावेळी देखील त्यांची सत्ता किती काळ टिकेल यावर देखील संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे लग्न ठरायच्या बैठकीत जर एवढी भांडण झाली तर पुढे जाऊन संसार कसा नीट होणार ? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

सत्ता स्थापनेसाठी होत असलेला उशीर यामुळे राज्यातील नागरिक म्हणून मला चिंता वाटत आहे. कारण येथील ग्रामीण भाग सध्या पावसामुळे होरपळत आहे तर शहरातील नागरिकांपुढे देखील अनेक समस्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सत्ता स्थापन करून जनतेला आधार देण्याची गरज आहे. युती मध्ये असलेला वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे असा घणाघात देखील यावेळी रोहित पवार यांनी केला.

Visit : Policenama.com