NCP MLA Rohit Pawar In Belgaum | ‘जे शरद पवार म्हणाले होते, ते रोहित पवार यांनी करून दाखवले’; सर्वांना चकित करत बेळगावात दाखल

बेळगाव : वृत्तसंस्था – NCP MLA Rohit Pawar In Belgaum | महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न पेटला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे मंगळवारी बेळगावमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे. (NCP MLA Rohit Pawar In Belgaum)

 

गेल्या महिना भरापासून सुरू असलेला महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न काही केल्या शांत होण्याचे नाव घेत नाहीये. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सातत्याने केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे हे प्रकरण अजून पेटत आहे. मध्यंतरी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्याला जाणार होते. पण, मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विनंती नंतर सदर दौरा टाळला होता. विरोधकांनी त्यावेळी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या दबावाला महाराष्ट्र सरकार झुकले, असे म्हणत राज्य सरकारवर कडाडून टीका केली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे मंगळवारी बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. सीमावादावर वातावरण तापलेले असताना आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री धमक्या देत असल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार हे बेळगावात दाखल झाल्याने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. बेळगावात रोहित पवार मराठी भाषिकांना भेटले. (NCP MLA Rohit Pawar In Belgaum)

 

तत्पूर्वी, सीमावाद पेटल्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली होती.
त्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधत कर्नाटक सरकारला इशारा दिला होता.
“संविधानाने सर्व भारतीयांना अधिकार दिले आहेत, कर्नाटकमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या घटना घडत आहेत, वेगवेगळी वक्तव्ये होत आहेत. हे अतिशय चिंताजनक आहे.
त्यामुळे सीमाप्रश्नी आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. हे प्रकरण येत्या ४८ तासांत संपलं नाही,
तर मला बेळगावात जावं लागेल. तेथिल स्थानिकांना धीर द्यावा लागेल,” असे शरद पवार म्हणाले होते.
त्यानंतर शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी स्वतः बेळगावात जाऊन मराठी भाषिकांची भेट घेतली.

 

Web Title :- NCP MLA Rohit Pawar In Belgaum | rohit pawars ganimi kava entered belgaum defying the threat of the chief minister of karnataka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nanded Crime | आदिवासी आश्रमशाळेतील 10 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; नांदेडमधील प्रकार

Prashant Damle | प्रशांत दामलेंची औरंगाबादच्या रस्त्यांवर टीका; ‘ती’ पोस्ट चर्चेत

Urfi Javed | उर्फी जावेद पुन्हा एकदा अडकली कायद्याच्या कचाट्यात; ‘या’ व्यक्तीने दाखल केली तक्रार