रोहित पवार हे इंदोरीकर महाराजांबद्दल पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – इंदोरीकर महाराज यांचं समर्थन राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केले आहे. महाराज हे मुद्दाम बोलत नाहीत. त्यांनी आज लेखी माफी मागितली आहे. भाजपचे लोक जसं एखादं वाक्य मुद्दाम बोलतात तसं महाराज बोलत नाहीत, असं रोहित पवार म्हणाले.

एकीकडे रोहित पवार यांनी महाराजांचं समर्थन केलं आहे पण या प्रकरणाची चोकशीही झाली पाहिजे असं ते म्हणाले. ‘इंदोरीकर महाराजांची कीर्तन करण्याची पद्धत सोपी असते. व्यसनमुक्ती सारखे काम ते करतात, त्याच बरोबर ते असे बोलले आहेत का? त्यांचा हेतू काय होता हे तपासले पाहिजे’, असे रोहित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचा खरपूर समाचार

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उस्मानाबाद इथं बोलताना रोहित पवार यांनी भरपूर समाचार घेतला आहे. ‘ते फक्त आमदार आणि कार्यकर्ते फुटू नये म्हणुन ओरडतात, ते कितीही ओरडले तरी वर्षभर ओरडतील, नंतर कोणी त्यांचं ऐकणार नाही’, असे म्हणत नाव न घेता रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज ?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती मुलं रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाइमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला, हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.’ असं इंदोरीकर महाराज त्यांच्या किर्तनात म्हणाले होते.