NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांना का द्यावं लागलं स्पष्टीकरण? ”बाहेर असल्याने शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही कुणी गैरअर्थ…”

मुंबई : NCP MLA Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथे दोन दिवसीय शिबीर (NCP Two Day Camp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वात सुरू झाले आहे. या शिबिराकडे आमदार रोहित पवारांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबत स्वत: रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात वाद असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. या वादामुळेच रोहित पवार हे जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या शिबिराला गैरहजर असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेबाबत रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही
झाली आहे. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये. (NCP MLA Rohit Pawar)

आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू, असे पवार यांनी म्हटले आहे.

तर जयंत पाटील यांनी या चर्चेबाबत म्हटले की, पक्षाचे हे शिबीर आज आणि उद्या असे दोन दिवस चालणार आहे.
रोहित पवार हे सध्या परदेशात आहेत. या शिबिराची तारीख ठरली त्याच दिवशी ते मला म्हणाले की या शिबिराला
ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी आधीच त्यांचे नियोजन केले होते. तरी त्यांनी सांगितले आहे की शिबिराच्या
पहिल्या दिवशी त्यांना शक्य नसले तरी ते आज संथ्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येण्याचा प्रयत्न करतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Breastfeeding Tips For Beginners | तुम्ही पहिल्यांदाच आई झाला आहात, तर जाणून घ्या स्तनपान करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे…

Foods For Stamina | स्टॅमिना वाढवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, कमी होईल पोट आणि कंबरेची चरबी…!

Pune Police MCOCA Action | हडपसर परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या सुरज उर्फ चुस मोहिते टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 109 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA