NCP MLA Rohit Pawar | शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका होत असताना दिग्गज नेते गप्प का?, रोहित पवारांचा स्वपक्षीयांना सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याव्यतिरिक्त एकाही बड्या नेत्याने भाष्य केले नाही. यावरुन आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका होत असताना पक्षातील दिग्गज नेते गप्प का? असा सवाल रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे.

 

महाराष्ट्रात काही नवीन तयार झालेले नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलत पदाची अपेक्षा करत असावेत. भाजपच्या (BJP) स्वयंघोषित नेते खालच्या पातळीवर बोलतात तेव्हा वरिष्ठ नेते शांत असतात. याचा अर्थ त्यांचेही याला पाठबळ असल्याचे दिसतं. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दात रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली.

 

तेव्हा कार्यकर्तेच लढतात

शरद पवारांनी अनेक नेत्यांना मोठं केलं. मात्र, त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातं, त्यावेळी कार्यकर्तेच लढतात. ही गोष्ट पाहिल्यावर मलाही खंत वाटते. ज्या नेत्यांनी पद भूषावली ते याबद्दल काहीच बोलत नाहीत. केवळ अजित पवारांनीच यावर प्रतिक्रिया व्यक्त केली, बाकीचे सर्व शांत बसले आहेत. आम्ही कार्यकर्ता म्हणून लढत राहू. शरद पवारांवर जो कोणी बोलेल, त्याला उत्तर देऊ, मात्र नेते गप्प का हे कळत नाही? अशी संतप्त प्रतिक्रिया रोहित पवारांनी व्यक्त केली.

 

काय म्हणाले मुनगंटीवार?

भाजपमध्ये ओबीसींचा (OBC) सन्मान होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (BJP Maharashtra State President) ओबीसी आहेत. या देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत. परंतु राष्ट्रवादीमध्ये ओबीसी आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी आहेत का? छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) स्वत:ला ओबीसी नेते म्हणवतात. मात्र कुठे आहेत ते? त्यांना तिथे महत्त्व नाही.

 

काँग्रेसचा (Congress) पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोकांसमोरील मोठा धोका आहेत.

 

त्यांना चौडी ताब्यात घ्यायची होती

सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकरांनी म्हटले, गेल्यावर्षी अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांच्या जयंतीला पवारांनी मस्ती केली, केली का नाही? यावर्षी पवार का नाही आला? पवार 4 वेळा मुख्यमंत्री, 12 वर्षे केंद्रात मंत्री होता, मागचं मला माहिती नाही. राज्यात 1999 पासून 2014 पर्यंत त्यांचा सरकार होतं, ते एकदाही चौंडीला आले नाहीत. गेल्यावर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती, असा आरोप पडळकर यांनी शरद पवारांवर केला.

 

पण दुसऱ्याकडून अपेक्षा नाही – अजित पवार

यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, संस्कार होतील, तसेच ते बोलणार आणि वागणार. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण, दुसऱ्यांकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्यावर बोलू शकत नाही, असे म्हणत पडळकरांचे नाव घेणं टाळलं.

 

 

Web Title :  NCP MLA Rohit Pawar | rohit pawar angry ncp leader because no reply
mungantiwar and padalkar critics sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा