NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांचा निशाणा अजित पवारांवर आणि सवाल भाजपाला, ”ज्या नेत्यांवर आरोप केले त्यांच्यावरील कारवाईचं काय?”

पुणे : NCP MLA Rohit Pawar | सत्ताधारी नेत्यांना एवढेच सांगणे आहे की, मी परदेशात होतो. मी चूक केली असती, तर भारतात आलोच नसतो. दुसरे म्हणजे चूक केली असती, तर अजित पवारांसोबतच भाजपामध्ये गेलो असतो. मात्र, आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे. ईडी (ED) आणि अन्य तपास यंत्रणांना सहकार्य करत राहू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी भाजपा (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना सुनावले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro) कंपनीच्या बारामती आणि पुणे कार्यालयावर ईडीने काल छापे टाकले. या धाडीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे जप्त केली आहेत. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटू लागले आहेत. याबाबत आज रोहित पवार यांनी आपली बाजू मांडली.

रोहित पवार ( NCP MLA Rohit Pawar) म्हणाले, माझा आक्षेप ईडी कारवाईवर नाही.
याआधीही ईडीला सहकार्य केले आहे. भाजपा सरकार आल्यानंतर सीआयडी, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभागानेही
कारवाई केली आहे. त्यांना सर्व कागदपत्रे दिली आहेत.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले, मी व्यवसायात आधी होतो,
नंतर राजकारणात आलो. जे लोक आधी राजकारणात होते आणि नंतर मोठे व्यवसायिक झाले, त्यांच्यावरील कारवाईचे
काय करणार आहात? हातोडा घेऊन कुठे कुठे गेला होता, त्याचे काय झाले?

रोहित पवार यांच्या कंपन्यांवर घर भेदीमुळे कारवाई झाली, असे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad)
म्हणाले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, मागील सात दिवसांत भाजपा आणि अजित पवार
गटातील कोण कोण दिल्लीला गेले, त्यांच्या प्रवासाची माहिती घ्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंची सध्याच्या राजकारणावर चौफेर फटकेबाजी! ”नेते लाचार, मिंधे, पैशासाठी वेडे झालेत”

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकावर FIR

MNS Chief Raj Thckeray | राज ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, ”आत्ताचं सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही, ती ‘सहारा’ चळवळ”

Sharad Mohol Murder Case | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा गोळया झाडून खून करणार्‍यांच्या काही तासात गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, आरोपींमध्ये 2 वकिलांचा समावेश (व्हिडीओ)