राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या गाडीचा अपघात

जळगाव : पोलीनामा ऑनलाइन – एरंडोलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. हा अपघात आज सकाळी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलचे आमदार सतीश पाटील हे आपल्या चार सहका-यांसोबत पारोळ्याला जात होते. रवांजे फाट्याजवळ पाटील यांची गाडी आली असता त्यांच्या गाडीसोमोर एक दुचास्वार आला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सटल्याने गाडी रसत्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. या अपघातात गाडीतील सर्वजण सुखरुप असून किरकोळ जखमा झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

या घटनेची माहिती मिळताच पाळधी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेलेली गाडी बाहेर काढली.