NCP MLA Sunil Shelke Booked For Kishor Aware Murder | किशोर आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके यांच्यासह 7 जणांविरूध्द FIR; जाणून घ्या फिर्यादीत नेमकं काय म्हंटलंय…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  NCP MLA Sunil Shelke Booked For Kishor Aware Murder | मावळमधील उद्योगपती आणि जनसेवा विकास समितीचे (Janseva Vikas Samiti) अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware) यांची भरदिवसा निर्घुण हत्या (Murder In Pune) केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके (NCP MLA Sunil Shelke) यांच्यासह त्यांचा भाऊ सुधाकर शेळके (Sudhakar Shelke), संदीप गराडे (Sandip Garad) , शाम निगरडकर (Shyam Nigadkar) आणि त्यांच्या ३ साथीदारांवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad Police) तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Talegaon Dabhade Police Station) गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. (NCP MLA Sunil Shelke Booked For Kishor Aware Murder)

याबाबत किशोर आवारे यांची आई सुलोचना गंगाराम आवारे Sulochana Gangaram Aware (वय ६९, रा. स्वप्ननगरी, तळेगाव दाभाडे – Swapna Nagari in Talegaon Dabhade) यांनी फिर्याद दिली आहे. किशोर आवारे तळेगाव नगरपरिषदेच्या (Talegaon Dabhade Municipal Council) मुख्याधिकार्‍यांना भेटण्यासाठी आले होते. बैठकीनंतर ते परत जाण्यासाठी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ आले असताना चौघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने (Koyta) वार केले. तसेच बंदुकीतून गोळीबार (Firing In Pune) केला. हल्ल्यात ते निपचित पडल्यानंतरही त्यांच्यावर हल्लेखोर वार करत होते. (NCP MLA Sunil Shelke Booked For Kishor Aware Murder)

सुलोचना आवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर आवारे हे जनसेवा विकास सेवा आघाडी या पॅनेलमधून तळेगाव येथे राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सुनिल शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे व त्यांचे कार्यकर्ते यांच्यात नेहमीच खटका होत असे.

गेल्या ६ महिन्यांपासून किशोर हा आपल्याला आमदार सुनिल शेळके, त्याचा भाऊ सुधाकर शेळके व संदीप गराडे यांच्यापासून जीवाला धोका असल्याबाबत सांगत असे. १५ सप्टेबर २०२२ रोजी त्यांचा वाहनचालक प्रविण ओव्हाळ (Pravin Oval) याला सुधाकर शेळके व त्यांच्या साथीदारांनी तो त्यांच्या सोबत असल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ केली होती. किशोर हा त्यांचा मित्र संतोष शेळके (Santosh Shelke) याच्यासोबत फिरत असे. संतोष शेळके आणि सुनिल शेळके यांच्यात राजकीय वितुष्ट होते.

 

किशोर हा संतोष शेळके याला मदत करीत असल्याने ते चिडून होते. तरी संतोष शेळके यांनी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. किशोर यांनी स्वत:चा वेगळा गट तयार करुन सुनिल शेळके याला गेल्या २ वर्षांपासून राजकीय विरोध केलेला आहे. तसेच शेळके व त्याच्या कार्यकर्ते यांनी केलेल्या चुकीच्या कामाच्या विरोधात वेळोवेळी निदर्शने केली होती. किशोर आवारे यांच्यामुळे त्यांच्या राजकीय वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता. तसेच माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर ते याच लोकापासून होईल असे त्याने फिर्यादी यांना प्रत्यक्षपणे सांगितले होते.

 

खूनाची घटना घडल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Chaubey),
सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे (IPS Dr. Sanjay Shinde),
अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी (IPS Vasant Pardeshi), पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore),
पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे (DCP Kakasaheb Dole),
सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanwat),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने (Sr PI Satyawan Mane),
पोलिस निरीक्षक किशोर पाटील (PI Kishor Patil) यांच्यासह आदी पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.
गुन्हयाचा युध्दपातळीवर तपास सुरू आहे.

 

Web Title :- NCP MLA Sunil Shelke Booked For Kishor Aware Murder | FIR against 7 persons
including NCP MLA Sunil Shelke, his brother Sudhakar Shelke in Kishore Aware murder case;
Find out exactly what the complaint says…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

Narayan Rane |  ‘राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार