राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने IPS हेमंत करकरेंच्या वेशात केला विधीमंडळात प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी खाकी वर्दी घालून निषेध केला. प्रकाश गजभिये 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरें सारखा पोलिसांचा पेहराव करुन विधान परिषदेत पोहचले. गजभिये यांच्या हातात एक तक्ता देखील होता ज्यावर लिहिेले होते की ही अंधश्रद्धा आहे की मी साध्वी प्रज्ञा यांच्या शापाने मरण पावलो, मी देशासाठी शहिद झालो.
prakash g

2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान म्हणाल्या होत्या की त्यांनी एटीएस चीफ हेमंत करकरे यांना शाप दिला होता त्यामुळे ते मरण पावले.

प्रकाश गजभिये पोलीस वर्दीत विधान परिषदेत पोहचले. सध्या विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे.

प्रज्ञा सिंह साध्वीने काय केले होते विवादास्पद विधान –
मी सांगितले होती की त्याचा विनाश होईल, बरोबर सव्वा महिन्याने सुतक लागते. ज्या दिवशी मी गेले होते त्या दिवशीपासून त्यांना सूतक लागले होते. बरोबर सव्वा महिन्यानंतर ज्या दिवसी दहशतवाद्यांनी त्यांना मारले त्या दिवशी त्यांचा अंत झाला.

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विधानाने मोठा वाद निर्माण झाला होता. याच विधानावर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे की, भाजपचे स्पष्ट मत आहे की स्वर्गीय हेंमत करकरे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. भाजपने कायमच त्यांना शहीद मानले आहे. साध्वी प्रज्ञा याचे ते वैयक्तिक विधान आहे. जे विधान अनेक वर्ष त्यांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे दिले गेले होते.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक