NCP MP Amol Kolhe | ‘राज्यकर्त्यांचे भान सुटलं तरी जनतेला…’; अमोल कोल्हेंचा वाचाळवीरांवरील कवितेचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MP Amol Kolhe | गेले अनेक दिवस भाजपच्या नेत्यांकडून महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान सुरू आहे. यात शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले अशा सर्व महापुरुषांचा समावेश होतो. भाजपकडून अशी वक्तव्ये सातत्याने होत असल्याने राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी एक व्हिडिओ (चित्रफीत) टाकत सातत्याने घडणाऱ्या घटनांवर संताप व्यक्त केला आहे.

 

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत बेताल वक्तव्ये करणाऱ्या राजकीय नेत्यांचे जरी भान सुटलं असलं तरी जनतेला मात्र अजून जाण आहे, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यासह इतर वाचाळवीरांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

 

जागलेली माणसं, वाचलेली पुस्तकं
रुजलेले विचार सारे कुतूहलाने गोळा झाले
हे नवीन पुतळे, ते नवीन बॅनर
एवढ्या अचानक कुठून आले?
पुतळ्यांच्या गळ्यात चपलांचे हार
प्रत्येक बॅनरला जोड्यांचा प्रसाद
रुजल्या विचारांनी आस्थेनं विचारलं
काय ओ पाव्हणं काय झालं?
पुन्हा कोणी समाज सुधारण्यासाठी
काम सुरू केलं?
प्रश्नासरशी बॅनर्सने लाजेने अंग गुंडाळून घेतलं
पुतळ्यांनी तर शरमेनं तोंडं लपवली
तरीही एका जागल्या माणसानं
त्यांची ओळख पटवली..
बॅनरवरील चेहरा पाहिला होता
भला मोठा हार घालताना
आवाजसुद्धा ऐकला होता
जोषपूर्ण भाषण ठोकताना..
अरेच्चा! हे तर तेच महोदय….
हे तर ते , ते तर हे म्हणता म्हणता
सगळ्या चेहऱ्यांची ओळख पटली..
निषेध उद्वेग संताप
सारं काही उमटलं होतं
प्रत्यक्षात जमत नाही म्हणून
बॅनर पुतळ्यांना कुटलं होतं
कळवळून शेवटी एक पुतळा बोलला
जोडे खाऊन खाऊन आम्हालाच कंटाळा आला…
डोक्यात शेण भरलंय त्यांच्या
अन् भोग मात्र आमच्या वाट्याला..
महापुरुषांच्या नखाचीही सर नसताना
का जावं अकलेचे तारे तोडायला

समाधानाने पुस्तकं फडफडली
चला, आमच्या शब्दांमध्ये अजून जान आहे
राज्यकर्त्यांचे भान सुटलं
तरी जनतेला मात्र जाण आहे..

 

Web Title :- NCP MP Amol Kolhe | shirur ncp mp amol kolhe poem slams bjp leader chandrakant patil statement on mahatma phule and dr babasaheb ambedkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई