शिवसेना राष्ट्रवादीच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचा कौल मान्य करून आपण विरोधीपक्षातच बसू, सत्ता स्थापनेचा कोणताही विचार नाही असं म्हटलं होतं. मात्र, खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे. विधानसभेचा निकाल लागून 11 दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. शिवसेनेला सत्ता स्थापनेमध्ये मदत करावी असे मत अनेक काँग्रेस नेत्यांचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसे संकेत दिलेले आहेत.

सुनील तटकरे म्हणाले की, ‘शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीतून नवीन राजकीय समीकरणं तयार होऊ शकतात. महायुतीला बहुमत मिळूनही त्यांनी सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाही. तसेच गेल्या पाच वर्षांत त्यांच्यामध्ये जसे वाद होते त्यापेक्षा अधिक वाद आता आहेत.’

सोनिया-पवार भेट
राज्यात निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेबाबतच्या पेचाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची यांची भेट घेतली. मात्र या भेटीबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

Visit : Policenama.com