NCP MP Supriya Sule | आता न्याय मागणारे खलनायक आहेत का?, कुस्तीपटूंशी झालेल्या गैरवर्तनावरुन सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारला संतप्त सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MP Supriya Sule | नव्या संसद भवनाचा उद्घाटन (New Parliament Building Inauguration) सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, दुसरीकडे जंतरमंतरवर (Jantar-Mantar) आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंना (Wrestlers) पोलिसांकडून मारहाण Delhi Police Beating) झाल्याचा आरोप करत सोशल मीडियातून संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांही पोलिसांकडून ऑलिम्पिक विजेत्या (Olympic Champion) खेळाडूंचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतर संताप व्यक्त केला आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brij Bhushan Singh)यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचा (Sexual Abuse) आरोप केला आहे. त्यांच्यावर गुन्हाही (FIR) दाखल झाला आहे. पण, अटकेच्या मागणीसाठी 23 एप्रिलपासून कुस्तीपटू जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. नव्या संसदेचं उद्घाटन होत असताना आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सांगत, रविवारी संसदेसमोर ‘महापंचायत’ भरवण्यात येणार होती.

दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना देखील आंदोलकांनी बॅरिकेट्स काढून संसद भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पैलवानांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यानचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये साक्षी मलिक (Sakshi Malik), विनेश फोगाट (Vinesh Phogat) आणि इतर कुस्तीपटूंची पोलीस धरपकड करत असल्याचे दिसत आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

Advt.

सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना मिळालेल्या अपमानास्पद
वागणुकीमुळे खूप निराश झालो आहोत. साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्याशी झालेलं गैरवर्तन निंदनीय आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आंदोलकांना मारण्यास परवानगी दिली होती का?
याचं उत्तर केंद्र सरकारने (Central Government) द्यावे.
ज्या खेळाडूंनी आपल्या देशाला खेळाच्या माध्यमातून सन्मान मिळवून दिला,
अशा खेळाडूंना न्यायासाठी लढाई करावी लागत आहे, हे खरोखरच दुर्दैवी आहे.
ज्या खेळाडूंचा विजयानंतर सर्वांनी सत्कार केला. मग आता न्याय मागणारे खलनायक आहेत का?,
असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :  NCP MP Supriya Sule Are there villains who are demanding justice now?,
Supriya Sule’s angry question to the central government over the mistreatment of wrestlers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा