NCP MP Supriya Sule | ‘महिलांवरील अत्याचार संतापजक, गृहमंत्र्यांनी…’, खासदार सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सल्ला

NCP MP Supriya Sule | crimes against women are outrageous the home minister needs to pay serious attention to the department supriya sule advised devendra fadnavis
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वी मुंबईतील मरीन लाईन्स येथील महिलांच्या वसतीगृहात एका तरुणीची हत्या झाली, आज मीरा रोड परिसरात लिव्ह इनमध्ये (Live in Relationship) राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याचे समोर आले आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) कारवाई करण्याची मागणी केली. तसेच राज्यातील गुन्हेगारीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा सल्ला सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी दिला.

खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी मुंबईसह राज्यातील गुन्हेगारीवरुन ट्विट करत कारवाईची मागणी केली. मुंबई येथील (Mumbai Crime News) मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या (Murder) केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे.

गुन्हेगारांना (Criminals) या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असा सल्ला दिला. तसेच या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी मरीन लाईन (Marine Line) परिसरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात (Savitribai Phule Hostel)
एका खोलीत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. बलात्कार (Marine Line Rape Case)
करुन तरुणीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला होता.

तर आज मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय प्रियकराने 32 वर्षीय प्रेयसीची हत्या
करुन तिचे कटरने लहान लहान तुकडे करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक नागरिकांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Web Title : NCP Chief Sharad Pawar | ‘What happened in Kolhapur does not suit Maharashtra’s character’, Sharad Pawar’s appeal after the protest of Hindutva organizations

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Violence | कोल्हापूर हिंसाचार प्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘आता जे झालं ते झालं, यापुढे…’

Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!

NCP Chief Sharad Pawar | ‘कोल्हापूरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही’, हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर शरद पवारांचं आवाहन

Total
0
Shares
Related Posts