‘बहोत हुई महंगाई की मार, अबकी बार लांबूनच नमस्कार’ : सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मागिल लोकसभा निवडणुकीत आताच्या सत्ताधाऱ्यांनी महागाईचा मुद्दा पुढे करत सत्ता मिळवली. मात्र, आज सर्वच घटकांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे आता ‘बहोत हुई महंगाई की मार, अबकी बार लांबूनच नमस्कार’ अस म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या दौंड तालुक्यातील राजेगाव येथे बोलत होत्या.

यावेळी बारामती मतदार संघातून सुळे यांच्याविरोधात भाजपने दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत काटे की टक्कर होणार आहे.

मागिल 2014 च्या निवडणुकीत सुळे यांना रासप उमेदवार महादेव जानकर यांनी चांगलीच टक्कर दिली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य हे लाखावरून हजारात आले होते. त्यातही जानकर यांनी दौड तालुक्यातून मताधिक्य मिळालं होत. त्यावर बोलतांनी सुप्रिया सुळे यांनी जे झाल ते झालं, गंगेला मिळालं. आता मात्र, यावेळी साथ द्या अशी भावनिक हाक येथील जनतेला दिली आहे.

या सरकारच्या मागील पाच वर्षाच्या काळात सर्वच घटक निराश झाले आहेत. त्यामुळेच मागील निवडणुकीत ‘बहोत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या या सरकारला ‘अबकी बार लांबूनच नमस्कार’ असं म्हणत त्यांना दूरच ठेवा असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी यावेळी केलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like