पुणे : NCP MP Supriya Sule | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांचे काम चांगले असताना चांदणी चौकाच्या (Chandni Chowk, Pune) कामाला काय दृष्ट लागली कळायला मार्ग नाही. येथे पादचाऱ्यांचा विचारच केलेला नाही. अपघात व्हायची वाट का बघत आहेत. चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केली आहे. चांदणी चौकांच्या पुलाची पाहणी केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन विषय मांडणार असल्याचे सांगितले.
या पाहणी दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे (Khadakwasla Assembly Constituency) अध्यक्ष सोपान काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, पुणे शहर युवकाध्यक्ष किशोर कांबळे, कुणाल वेडे पाटील, किरण वेडे पाटील, महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) म्हणाल्या, संसदेच्या अधिवेशनापूर्वी मी नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. हा प्रकल्प जेव्हा सुरु केला गेला तेव्हा पादचाऱ्यांचा विचार या ठिकाणी केलेला नाही. बारामती लोकसभा मतदारसंघ शून्य अपघात करण्याचा आमचा मानस आहे. यात राजकारण कुठे ही करु नये.
अजित पवारांच्या (Ajit Pawar) डेंग्यूच्या आजाराबाबत सुळे म्हणाल्या, आरोग्याच्या बाबतीत राजकारण करू नये.
आजार होतो तेव्हा माणसाने आराम करायचा असतो. मला माहिती आहे. अजित दादांना आरामाची गरज आहे.
आरोग्यमध्ये राजकारण आणणे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. हे माझे वैयत्तीक मत आहे.
दादांची चौकशी रोजच करते. बरे झाल्यावर मी त्याला भेटायला जाणार आहे. शेवटी तो माझा भाऊ आहे.
दादाने मुख्यमंत्री व्हावे ही माझी शेवटची इच्छा आहे, असे अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज काटेवाडी,
बारामती येथे ग्रामपंचायतीचे मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले होते.
यावर खासदार सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, अर्थातच कोणत्याही आईला आपल्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा