तुमच्याकडे कोणती वॉशिंग पावडर आहे ? सुप्रिया सुळे यांचा भाजपाला सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आमच्याकडे असल्यावर ज्यांच्यावर आरोप केले जातात, तेच त्यांच्याकडे गेले तर ते शुद्ध होतात. त्यांच्याकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे की त्यातून माणसे एकदम स्वच्छ धुतल्या तांदळासारखी होतात, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

खा. सुप्रिया सुळे यांची अहमदनगर येथून या संवाद यात्रेला सुरु झाली आहे. यात्रेला सुरुवात करण्याआधी सुप्रिया यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार गरीबांच्या पोटासाठी नाही, तर स्वतःच्या वोटसाठी काम करतय, हे देशाचं दुर्दैव असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. एवढेच नाही पक्षात होत असलेल्या पडझड बाबतही सरकारला धारेवर धरले. आमच्याकडे असताना ज्यांच्यावर आरोप होत होते, त्यांच्यावर कोणती वॉशिंग पावडर वापरून स्वच्छ करतात? पक्षात आता विचार राहिलेला नाही, अशी खंतही खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

सत्ता कुणाचीही येवो, मंत्रिमंडळ आमचेच

विधानसभा निवडणूका अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र या निवडणुकीनंतर सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची येणार आहे. जरी भाजपची आली, तरी जे राष्ट्रवादीतून गेले त्यांनाच मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे सत्ता कुणाचीही येवो, मंत्रीमंडळ आमचेच असेल, अशी कोपरखळी खा. सुप्रिया सुळे यांनी सरकारला मारली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like