भाजपनं वॉशिंग पावडरचं नाव सांगावे : खा. सुप्रिया सुळे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक आजी माजी आमदारांनी सत्ताधारी सेने – भाजपमध्ये प्रवेश प्रवेश केला आहे. यावर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असताना वाईट असणारे लोक भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ कसे ठरतात ? त्यासाठी कोणती वॉशिंग पावडर वापरली जाते ? भाजपनं त्या पावडरचं नाव सांगावं, असा तिरकस टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला आहे.

संवाद यात्रेनिमित्त सुळे आज नगरमध्ये होत्या. तिथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच आमचे बरेच लोक तिकडे गेले असल्यानं सत्ता कोणाचीही आली तरी आमचे लोकच सत्तेत असतील, असंही त्या म्हणाल्या.

देशात ११ राज्ये अशी आहेत, जिथं बाहेरच्या व्यक्तीला जमीन विकत घेता येत नाही. ३७० कलम हटवण्याच्या पद्धतीला आमचा विरोध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. इतकंच काय, मोदी सरकारने नागालँडसाठी स्वतंत्र घटना करण्यास मान्यता दिली आहे,’ असा खळबळजनक दावाही सुळे यांनी यावेळी केला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like