NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानावर राज्यातील राजकारण तापले आहे. राज्यपालांना हटविण्याची मागणी जोर धरत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची आता गरज आहे, असे सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

 

दोनही छत्रपतींनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जी भूमिका घेतली आहे, ती योग्य आहे. मी त्यांचे स्वागत करते. सातत्याने भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष कोश्यारींची पाठराखण करत आहेत, त्यांचा मी निषेध करते. शिवाजी महाराजांच्या नावामुळे महाराष्ट्राची एक वेगळी ओळख देशात आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी आपले हेवेदावे थोडा वेळ बाजूला ठेऊन, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी व्यक्त केले.

 

तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. त्याबद्दल सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची जी एक वेगळी संस्कृती आहे, जी अनेक दशके आपल्या ज्येष्ठांनी जपलेली आहे,
ती कुठेतरी ढासळताना दिसते आहे, तिला सावरुया. सुसंस्कृतपणा जो आधी होता तो परत आणण्याचा प्रयत्न करूया,
असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे.

 

Web Title :- NCP MP Supriya Sule | leaving aside politics everyone needs to come together for maharashtras identity supriya sule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या घरात ‘या’ कलाकारांनी घेतली वाईल्ड कार्ड एन्ट्री

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल