NCP MP Supriya Sule | ‘कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन… ‘ – सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MP Supriya Sule | राज्यसभेच्या सहा जागेच्या निवडणूक (Rajya Sabha Elections) निकालात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीन उमेदवार आणि भाजपचे (BJP) तीन उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे सहाव्या जागेसाठी असणारी चुरशीच्या लढतीत भाजपने मोठा विजय मिळवत धनंजय महाडिकांनी (Dhananjay Mahadik) बाजी मारली आहे. तर, शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला. यामुळे आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. काही मतं फुटल्याने हा धक्कातंत्र पाहायला मिळत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

‘भाजपने हा रडीचा डाव खेळला, ‘ अशा शब्दात सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपने हा रडीचा डाव खेळला. शरद पवार (Sharad Pawar) यावर सगळं बोललेच आहेत. आम्ही ड्रामा करत नाही, आम्ही खूप सिरियस काम करतो. महाविकास आघाडीच्या प्रत्येक आमदाराने जबाबदारीने मतदान केलं, ” असं देखील त्या म्हणाल्या.

 

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कभी कभी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है,’ असं देखील त्या म्हणाल्या.

आमचे नेते पन्नास वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षं ते विरोधात होते तर अर्धी वर्षं सत्तेत,
असंही त्या म्हणाल्या, दरम्यान, सुप्रिया सुळेंनी भाजपला शुभेच्छा ही दिल्या आहेत.
भाजपच्या या यशात एकट्या देवेंद्रजींचं नाहीतर चंद्रकांत पाटील यांचंही योगदान आहेच की, अकेला देवेंद्र सबपे भारी,” या भाजपच्या घोषणेवरून सुप्रिया सुळेंनी चिमटा देखील काढला आहे.

 

दरम्यान, “महाविकास आघाडी एक दोन दिवसात बैठक घेईल. त्यानंतर स्पष्ट होईल, कुठं काय कमी पडलं.
आम्ही रोज रिक्स घेतो. ज्या घरात माझा जन्म झाला तिथं मी जेवढं यश बघितलं तेवढंच अपयश बघितलं आहे,”
असं देखील त्या म्हणाल्या.

 

 Web Title :- NCP MP Supriya Sule | ncp mp supriya sule criticism after rajya sabha election 2022 result

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला पळवून नेवून लैंगिक अत्याचार, 20 वर्षीय तरूणाचं कृत्य

 

Chandrakant Patil | ‘देवेंद्र फडणवीस हे वेगळंच रसायन; त्यांच्या डोक्यात…’ – चंद्रकांत पाटील

 

Ravi Paranjape Passes Away | प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचं 87 व्या वर्षी पुण्यात निधन