NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर, छगन भुजबळांसारख्या…

मुंबई : राज्य सरकारमधील (State Govt) कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सध्या मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सरकारविरोधी वादग्रस्त भूमिकेमुळे चर्चेत आहेत. राज्यात बेकारी, दुष्काळसदृश्य स्थिती आणि ड्रग रॅकेट इत्यादी प्रकरणे गंभीर वळणावर आहेत. या परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर आज टीकेचा आसूड ओढला. शिंदे सरकारचा (Shinde Govt) खोके सरकार असा उल्लेख करत सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी छगन भुजबळांना देखील सल्ला दिला. त्या प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, छगन भुजबळांसोबत आम्ही अनेक वर्षे काम केले. माझी छगन भुजबळांना इतकीच विनंती आहे की ज्या मागण्या व्यासपीठावर करता त्या मागण्या बंद दाराआड केल्या तर बरे होईल. छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे त्यांना हा अधिकार आहे. महाराष्ट्राच्या दुर्दैवी आणि गलिच्छ राजकारणात जो गोंधळ सुरु आहे त्यात छगन भुजबळ यांना मंत्रीपद आहे. खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महायुती सरकारकडे २०० आमदार असूनही कॅबिनेट मंत्र्याला बाहेरचे व्यासपीठ लागत असेल तर संजय राऊत (Sanjay Raut) जे म्हणतात तसे कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरु आहे का? नाशिकचे लोक आत्ताच मला भेटले. तिथल्या ड्रग माफियाची चर्चा सातत्याने होत आहे. सत्तेतील लोक कॅबिनेटचे विषय सभांमध्ये मांडत आहेत. यावरूनच ट्रिपल इंजिन खोके सरकारमधील मिसमॅनजमेंट समजते. कॅबिनेट मंत्री बाहेर येऊन बोलत असतील तर मग कॅबिनेटमध्ये काय होते? ट्रिपल इंजिन खोके स्वार्थी सरकारमुळे महाराष्ट्राचे नुकसान होते आहे.

सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) म्हणाल्या, नक्की सरकारची भूमिका काय आहे? ते कळले पाहिजे.
महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे आहेत.
तसेच उपमुख्यमंत्री क्रमांक १ आणि २ यांना विचारले पाहिजे.

आमचे पहिल्यापासून मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या मागे
ताकदीने उभा आहे. आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही भ्रष्ट पार्टीसारखे नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हटले की, महाराष्ट्रात दुष्काळ, अतिवृष्टी यांची जबाबदारी कोण घेणार?
महागाई वाढते आहे त्याला जबाबदार कोण? या सरकारमधली भांडणे संपली तरच राज्य पुढे जाईल.
या सरकारला पैशांची आणि सत्तेची मस्ती आली आहे. ही मस्ती जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : मेडिकल प्रवेशाच्या आमिषाने 27 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

Manoj Jarange Patil | सरकारकडे जरांगेंची मागणी, जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा

Pune Crime News | प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरूणीची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News | पुणे : ‘मोठ मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना ओळखतो’ म्हणत महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंग करणाऱ्या दोघांवर FIR